महाभारत काळात या परिसरात विराट राजाचे राज्य होते. पांडव अज्ञातवासात असतांना भिमाने किचकाचा वध याच ठिकाणी केला होता. मूळचा गाविलगड किल्ला मातीचा होता. १२ व्या शतकात गवळी राजाने ( यादव) हा किल्ला बांधला होता. त्यावरूनच त्याला "गाविलगड" हे नाव पडले. आज अस्तित्वात असलेला दगडाचा किल्ला बहामणी घराण्यातील नववा राजा अहमदशहा वली याने इ.स.१४२५ मध्ये बांधल्याचा उल्लेख " तारिख-ए-फरीश्ता" या ग्रंथात आढळतो. पुढे इ.स. १४८८ मध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने या किल्ल्याची दुरुस्ती केली व विस्तार केला. इमादशाही घराण्याच्या मूळ पुरूष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क हा मूळचा विजयनगर साम्राज्यातील ब्राम्हणाचा मुलगा होता. बहामनी राज्याच्या बेरार (वर्हाड) प्रांताचा सेनापती खान-ए-जहानचा खास मर्जीतील हा मुलगा पुढे बहामनी राज्याचा सेनापती बनला. बहामनीच्या पडत्या काळात त्याने इ.स. १४९० मध्ये गाविलगडावर इमादशाहीची स्थापना केली. गाविलगड किल्ल्याची दुरुस्ती करतांना त्याने शार्दुल दरवाजाची निर्मिती केली, त्या दरवाजावर विजयनगर साम्राज्याचे चिन्ह गंड भेरूंड कोरले, त्याच बरोबर खजूराचे झाड व शार्दुल ही मुसलमान शासकांची चिन्हेही कोरली. इमादशाही घराण्याने ९० वर्षे वर्हाड प्रांतावर राज्य केले. त्यानंतर १५७२ मध्ये गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले निजामशाहीत सामिल झाले. बैरामखान याने इ.स. १५७७ मध्ये निजामशाहीच्या कारकिर्दीत किल्ल्याची पुन्हा दुरुस्ती केली व एका बुरूजावर शिलालेख कोरला.आज तो बुरुज "बैराम बुरुज" म्हणून ओळखला जातो. इ.स.१५९८ मध्ये अकबराने गाविलगड किल्ला मुघल साम्राज्याला जोडला. परंतू मलिक अंबरने तो पुन्हा निजामशाहीत आणला. शहाजहानच्या काळात गाविलगड किल्ला पुन्हा मुघल साम्राज्यात गेला. इ.स. १७३८ मध्ये रघूजी भोसले यांनी शुजातखानचा पराभव करुन गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले ताब्यात घेतले. पण लवकरच हे किल्ले पुन्हा निजामाच्या ताब्यात गेले. निजाम व पेशवे यांच्यातील भांडणाचा फायदा घेऊन मुधोजी भोसले यांनी १७५२ मध्ये गाविलगड जिंकून घेतला. इ.स. १७६९ मध्ये माधवराव पेशवे वर्हाडावर चालून येत आहेत असे कळल्यावर भोसल्यांनी त्यांचा कुटुंब कबिला व जडजवाहीर गाविलगड किल्ल्यावर हलविले. भोसल्यांनी किल्ल्याच्या बाहेर परकोट बांधला तोच बाहेरील किल्ला म्हणून ओळखला जातो. १३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाल व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले.त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले. इ.स. १८५७ मध्ये किल्ला क्रांतिकारकांच्या हाती जाऊ नये म्हणून इंग्रजांनी गाविलगडाची डागडूजी केली.
गडावरील ठिकाणे किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ तलाव आहेत. साधारणत: १० तोफा नाजूक स्थितीमधे असल्या तरी अजूनही शाबूत आहेत. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो. मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; पण तोही दुर्लक्षित आहे.
शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करण्यासारखे आहे. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय अशीच आहेत. लांबरुंद पायऱ्या संपल्या की दरवाजामधून किल्ल्यात प्रवेश होतो. आतील पहारेकऱ्यांच्या उभे राहण्याच्या जागा व घुमट पाहून पुढे गेल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चौथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा वाट अडवून उभा असतो. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशा प्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर...
Read moreThe fort takes its name from the Gawali (cow herds) who inhabited the Berar (modern day Amravati) for centuries. Earlier the fort was likely just made of mud as were several such areas in the region. The exact date of construction is not known but the Persian historian, Firishta, records that Ahmed Shah Wali, the ninth king of the Bahamani dynasty reconstructed Gawilgarh when he was encamped at Ellichpur in 1425. Likely this was the date when major fortification was carried out.
In 1803 during the 2nd Maratha war the fort was besieged by Arthur Wellesley (later Duke of Wellington). After two failed attempts at the main gate by British and Sepoy companies, and many casualties, Captain Campbell led the 94th Highlanders (light company) up the ravine dividing the inner and outer forts and into the inner fort by escalate. The Scots then forced the northern gatehouse and opened the many gates, allowing the remaining British forces entry. The British suffered few casualties in the final assault. The fortress was returned to the Killedar Rana Shivsingh Rajput of the Maratha Empire, after making peace with the British but they...
Read moreGawilgarh Fort is an incredible hidden gem that offers a fascinating journey into history! Perched atop the Satpura Range, the fort provides breathtaking panoramic views of the surrounding valleys, making the trek up well worth the effort. The fort itself is massive, with well-preserved bastions, walls, and gates that tell tales of its glorious past.
Exploring the fort feels like stepping back in time. The ancient architecture, intricate carvings, and the remains of the grand structures are awe-inspiring. The peaceful ambiance, away from the hustle and bustle, adds to the charm, making it a perfect spot for history enthusiasts and nature lovers alike.
However, be prepared for a bit of a hike and bring your essentials, as there are limited facilities around the fort. It’s advisable to visit with a guide to truly appreciate the historical significance and the stories behind each corner of this majestic fort.
Overall, Gawilgarh Fort is a must-visit for anyone looking to experience the beauty and history of...
Read more