!! श्री देव घोडेमुख प्रसन्न !!
श्री क्षेत्र देव घोडेमुख जत्रोत्सव, मातोंड-पेंडूर. ता.वेंगुर्ला.
वेंगुर्ला तालुक्या अंतर्गत येणारे मातोंड-पेंडूर गाव. प्राचीन परंपरा लाभलेला हा गाव. मातोंड-पेंडूर गावाचे ग्रामदैवत व श्री शंकराचे रूप अशी ख्याती कीर्ती असलेले, दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धी पावलेले ३६० चाळ्यांचा अधिपती श्री देव घोडेमुख देवस्थान.
या देवस्थानाबद्दल गावात ज्या आख्यायिका ऐकिवात येतात, त्यावरून असे कळते कि एक सत्पुरुष सरदार, जे सावंतवाडी संस्थानात सेवा बजावत असत. ते जेव्हा आपल्या घरी परतत (नक्की कुठचे गाव ती माहती उपलब्ध नाही), तेव्हा न्हावेली गावाची सीमा ओलांडून मातोंड-पेंडूर (तेव्हा चे मार्तंडपुरी आताचे मातोंड-पेंडूर), गावात प्रवेश करीत तेव्हा त्यांचा अश्व (घोडा) थबकून उभा राही. काही केल्या पाऊल उचलत नसे .जेव्हा ते त्यावरून पायउतार होत तेव्हा तो अश्व चालू लागे . सातत्याने असे घडू लागल्यावर त्यांनी याबाबत, तेव्हाचे आचार्यगुरु यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांना श्री शिव शंकराच्या ह्या रूपाबद्दल दृष्टांत झाला, आणि तेव्हा श्री घोडेमुख देवाचे लिंग रुपी पाषाण, डोंगर माथ्यावर घनदाट गर्द वनात शोधून त्यांनी तिथेच प्रस्थापित केले. अश्वामुळे या दैवताची प्राप्ती झाली, त्यामुळे या दैवताला घोडेमुख असे संबोधले गेले . या मातोंड-पेंडूर गावात अश्वावर आरूढ होणे निषिद्ध आहे. इतकेच नाही तर गावातल्या कुणालाही अश्वारूढ होता येत नाही जेणेकरून देवतेचं अपमान होईल . ज्या वनात .... (लोकभाषेत जंगलात), श्री घोडेमुखाचे वास्तव्य आहे त्याला "युवराचे रान" असे नाव होते. परंतु श्री घोडेमुख देव स्थापन झाल्यावर, त्याला त्यांच्याच नावे ओळखले जाऊ लागले. जस जसा काळ उलटत गेला, तसतशी देवंस्थानाची कीर्ती सर्वत्र पसरत गेली. गावाच्या परंपरेनुसार पुढे या देवस्थानाचे धार्मिक विधी सुरु झाले .ह्या देवस्थानात होणारी मानाची कोंबड्यांची जत्रा प्रसिद्ध आहे.
३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून ख्याती असलेला, तसेच भक्तांच्या हाकेला धावणारा, व नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे .श्री देव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाच्या प्रतिकृतीचे दान करण्याची प्रथा आहे . असे केल्यास अवयवाला असणारे दुखणे कायमचे थांबते, अशी भाविकांची समजूत आहे. मातोंड गावच्या देवस्थानाची देवदीपावली दिवशी, सातेरी मंदिरात मांजी बसते. यानंतर सलग चार दिवस या मंदिरात जागर होत असतो . पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुखाच्या जत्रौत्सवादिवशी, सकाळी गावकर मंडळी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भुतनाथ व पावणाई या देवांच्या तरंगकाठ्यासह, घोडेमुख देवस्थानाकडे डोंगर चढून येतात. श्री देव घोडेमुख क्षेत्रात केळी, नारळ,गोड पदार्थ नैवेद्य दाखवला जातो. भुतनाथ व पावणाईदेवीला तेथे गोडा उपहार दाखवण्यात येतो. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या श्रद्धेने, श्री देव घोडेमुखला कोंबड्यांचा मान (श्री देव घोडेमुख च्या अधिपत्याखाली येणाऱ्या चाळे, भूत - पिशाच्च, गण यांच्यासाठी ) देण्यासाठी दाखल झालेले असतात. भाविक आपल्या मनोकामना गावकऱ्याद्वारे गाऱ्हाण्याच्या स्वरूपात श्री देव घोडेमुखाकडे मांडतात. त्यानंतर सायंकाळी खऱ्या अर्थाने डोंगर उतारावरुनच श्री देव घोडेमुख चरणी कोंबड्यांचा मान देण्याच्या कार्यक्रमाला सुरवात होते. जवळपास 20 ते 25 हजार कोंबड्यांचा मान या जत्रौत्सवात देण्यात येतो. सायंकाळच्या वेळेस हा मान देण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर, पावणाई व भुतनाथ अवसारासह खाली येऊन पुन्हा सातेरी मंदिराकडे रवाना होतात. असंख्य भाविकांच्या गर्दीने श्री देव घोडेमुखाचे क्षेत्र फुलून जाते. शिव मार्तंडेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले हे देवस्थान, प्रवेशद्वारापासून ८५० मीटर चढून गेल्यावर डोंगरावर आहे. डोंगराच्या एका टोकावर वसलेल्या या मंदिराचे दर्शन हे डोंगराच्या चार दिशेने घेता येते. मंदिराच्या पायथ्याशी भाविकांचा जत्रौत्सवासाठी मोठा जनसागरच लोटतो. सकाळपासूनच मोठ्या उत्साहात श्री देव घोडेमुखाच्या क्षेत्रात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात होते. या जत्रौत्सवात सहभागी होण्यासाठी चाकरमानीही मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात दाखल होतात. शिवमार्तंड रूपात साकार जाहला.... तो देव माझा घोडेमुख मी मूर्तिमंत पाहिला.... घोड्यावरी स्वार होवून भक्तांच्या हाकेला धावला... सरसेनापती तू या गावचा.... करूणारूपी ध्यास तयाचा.... तना मनासी गजर तुझ्या नामाचा.... समृद्धीचा अखंड निर्झर तू नाम तुझे शिवशंकर... भक्तांनी फुलूनी गेला डोंगर अवघा,........ उसळला भक्तीचा...
Read moreकोकणातील प्रसिद्ध देवस्थान व 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख अर्थात कोब्यांच्या जत्रौत्सवात आज शेकडो भाविक सहभागी झाले. मातोंड-पेंडूर येथे हा सोहळा झाला.
जिल्हाभरातून असंख्य भाविकांच्या गर्दीने आज श्रीदेव घोडेमुखाचे क्षेत्र फुलून गेले होते. मातोंड आणि पेंडूर या दोन गावांच्या सीमेवरच श्री देव घोडेमुखाचे देवस्थान आहे. शिव मार्तंडेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले हे देवस्थान प्रवेशद्वारापासून 700 मीटर चढून गेल्यावर डोंगरावर आहे. मंदिराच्या पायथ्याशी भाविकांच्या जत्रौत्सवाचा आज मोठा जनसागरच लोटला. आज सकाळपासूनच मोठ्या उत्साहात श्रीदेवघोडेमुखाच्या क्षेत्रात विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरवात झाली. या जत्रौत्सवात सहभागी होण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून चाकरमानीही मुंबई, गोवा, कर्नाटक येथूनही मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. आज सकाळी एस. टी व बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी दिसून येत होती.
भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या व नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीदेव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाच्या मातीच्या प्रतिकृतीचे दान करण्याची प्रथा आहे. असे केल्यास त्या अवयवाला असणारे दुखणे कायमचे थांबते, अशी भाविकांची समजूत आहे. मातोंडच्या देवस्थानच्या देवदीपावली दिवशी सातेरी मंदिरात मांजी बसते. त्यानंतर सलग चार दिवस या मंदिरात जागर होत असते. आज पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुखाच्या जात्रौत्सवादिवशी सकाळी 9 वाजता गावकर मंडळी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भुतनाथ व पावणाई या देवाच्या तरंगकाठ्यासह घोडेमुख देवस्थानाकडे डोंगर चढून आले. त्यानंतर श्रीदेव क्षेत्रात केळी व नारळाचा नवस दाखविण्यात आला.
भुतनाथ व पावणाईदेवीला तेथे गोडा उपहार दाखविण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या श्रद्धेने व भावनेने कोब्यांचा बळी देण्यासाठी येथील परिसरात दाखल झालेला भाविक आपल्या मनोकामना गावकाऱ्याद्वारे गाऱ्हाण्याच्या स्वरुपात श्रीदेव घोडेमुखाजवळ मांडत होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने डोगर उतारावरूनच कोंब्याच्या बळी देण्याचा कार्यक्रमाला सुरवात झाली. जवळपास 20 ते 25 हजार कोंब्याचा बळी जत्रौत्सवात देण्यात आला. सायंकाळी हा बळी देण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पावणाई व भुतनाथ अवसारासह खाली येऊन पुन्हा सातेरी...
Read moreThis is a Hindu temple located on a high hill. There are not many amenities close by. The hill itself is quite a walk and the terrain isn't always in climbing conditions. There are no proper stairs. Elderly people should seek help while climbing and it is recommended to climb as a group. It isn't too steep in all areas but some areas can be tricky to climb. Apart from that the actual temple is a calm and relaxing place with beautiful scenery...
Read more