Fort is ok. But public amenities and maintenance need to be improved..
Historical Background:
Bahmani Sultanate (1347–1527):
Paranda Fort was initially built during the reign of the Bahmani Sultanate, which ruled much of the Deccan. The Bahmanis needed a strong defense in their southern territories, and Paranda served this purpose by protecting the region from possible invasions.
It was a strategically important fort due to its location in the plains of the Marathwada region, which made it easier to control and defend against enemies.
Nizam Shahi Dynasty (1490–1636):
After the Bahmani Sultanate fractured, Paranda came under the control of the Nizam Shahi rulers of Ahmednagar. During their reign, the fort was further strengthened and became a crucial defensive stronghold, particularly during their conflicts with the Mughals and other Deccan sultanates.
The fort played a significant role in the Nizam Shahi’s efforts to resist Mughal expansion into the Deccan. It was used as a military base to launch campaigns and defend their territories from Mughal invasions.
Mughal Era (17th Century):
Eventually, during the expansionist campaigns of the Mughal Emperor Aurangzeb, Paranda Fort fell into the hands of the Mughals. It was incorporated into their vast network of forts in the Deccan, becoming part of their military...
Read moreसह्यद्रीची मुख्य धार सोडून देशावर सरकू लागलो, की नगर, खर्डा, करमाळा, परांडा, सोलापूर, नळदुर्ग, औसा, उदगीर, कंधार, नांदेड, माहूर, धारूर अशी बुलंद भुईकोटांची मोठी साखळीच भेटू लागते. यातीलच परांडय़ाच्या वैभवशाली स्थापत्याची ही मुशाफिरी.सहय़ाद्रीची मुख्य धार सोडून देशावर सरकू लागलो, की किल्ल्यांचे रूप गिरिदुर्गाकडून भुईकोटांकडे वळते. उस्मानाबाद ऊर्फ धाराशिव जिल्हय़ातील परांडा तालुक्याच्या गावीही असाच एक बुलंद भुईकोट आहे. गावात शिरेपर्यंत त्याचे हे रूप ध्यानी येत नाही, पण एका वळणावर अचानक होणारे त्याचे दर्शन धडकी भरवून जाते! मूळची ही प्रत्यंडक नगरी! काही ठिकाणी याचा उल्लेख परमधामपूर, प्रकांडपूर, पलियंडा असाही झाला आहे. कल्याणीच्या चालुक्यांचे हे शहर आणि त्यांचीच ही दुर्गनिर्मिती, ज्याला पुढे मुस्लीम राजवटींनी अधिक बुलंद केले. कर्नाटकातील धारवाड जिल्हय़ातील हावेरी तालुक्यातील होन्नत्ती गावी शके १०४६ म्हणजे इसवी सन ११२४ सालचा एक शिलालेख मिळाला आहे, ज्यामध्ये या पलियंड गावचा उल्लेख आला आहे. चार हजार गावांचे मुख्य केंद्र असलेल्या या पलियंड नगरावर महामंडलेश्वर सिंघणदेव राज्य करत असल्याचा हा उल्लेख! हा पलियंड पुढे पलांडा, मग परिंडा आणि आताचा परांडा होत गेला! सोलापूर जिल्हय़ातील कुर्डूवाडी शहरापासून २५, तर बार्शीपासून २३ किलोमीटरवर हे परांडा गाव आणि किल्ला! या परांडय़ाला येण्यासाठी पुणे, मुंबई, सोलापूरहून थेट बससेवाही उपलब्ध आहे. याशिवाय भूम, बार्शी आणि कुडरूवाडीतूनही इथे येण्यासाठी ठराविक अंतराने बससेवा आहे. पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावरील कुर्डूवाडी स्थानकावर उतरूनही परांडा जवळ करता येते. कोट-परकोट आणि त्याभोवती खंदक अशी या भुईकोटाची रचना! एका मागे एक तीन दरवाजे. या नागमोडी मार्गातील पहिला दरवाजा त्याच्या त्या तुटलेल्या दरवाजांसह आपले स्वागत करतो. आत यावे तो सर्व बाजूने तट-बुरुजांचे बांधकाम अंगावर येते. वर निमुळते होत गेलेले ते अर्धगोल-अष्टकोनी बुरूज, त्याच्या टोकाकडील ते गवाक्ष, तोफांच्या खिडक्या, अंगावर बाण सुटावेत त्याप्रमाणे त्या तटातून विविध कोनांतून बाहेर येणाऱ्या जंग्या (मारगिरीची छिद्रे), संपूर्ण तटातून जागोजागी डोकावणाऱ्या तोफा.. हे सारेच दृश्य एका बुलंद वास्तुची दहशत निर्माण करते. या दहशतीच्या छायेखालीच पुढे दुसऱ्या दरवाजाची कडी वाजवावी. याचाही दरवाजा अद्याप शाबूत. त्याला ओलांडून पुन्हा एक वळण घेत तिसऱ्याच्या दारात उभे ठाकावे. या दरवाजाच्या दारात एक चौकोनी आकाराची छोटीशी विहीर आहे. या विहिरीला आजही पाणी आहे. जणू हे पाणी पायांवर घेतच प्रवेश करायचा. या दरवाजाच्या लाकडी फळय़ा, त्यावरील पोलादी सुळे, साखळदंड अद्याप शाबूत आहेत. याच्या कमानीवर मध्यभागी डोळय़ाच्या आकारात एक फारसी लिपीतील शिलालेख बसवलेला आहे. याचे वाचन झाले नसल्याने त्याचा अर्थ लागत नाही, पण बहुधा या परांडय़ाला हे बुलंद रूप देणाऱ्या कुठल्यातरी शाही राजवटीचाच यावर उल्लेख असणार! हा गड मूळचा हिंदू राजवटीचा! त्याच्या खाणाखुणा आजही इथल्या बांधकामावर जागोजागी दिसतात. त्याची पुनर्उभारणी केली बहमनी सत्तेचा प्रधान महमद गवान याने. पुढे निजामशाही, मुघल, आदिलशाही आणि पुन्हा मुघल असा या गडाने बराच काळ मुस्लीम राजवटींचाच अनुभव घेतला. यामुळे इथल्या स्थापत्यशैलीवरही त्यांचाच प्रभाव जाणवतो. हा सारा इतिहास लक्षात ठेवत दुर्गदर्शन सुरू करावे. वाटेत उजव्या हाताला दारूगोळा आणि तोफांनी भरलेले एक कोठार दिसते. दारूगोळय़ासह हजरतीस असलेले आज हे एकमेव दारूकोठार. काही वर्षांपूर्वी गडावर करण्यात आलेल्या सफाईमध्ये मिळालेले दारूगोळे आणि छोटय़ा तोफा इथे हारीने लावून ठेवल्या आहेत. या कोठारालाच लागून एक छोटासा चौकोनी आड आहे.उजव्या हाताची वाट एका छोटय़ा दरवाजातून गडातील पूर्वाभिमुख मशिदीत जाते. चाळीस खांबांची ही मशीद! तिचे खांब, उत्तरेकडील भिंतीतील दगडी जाळी हे सारेच स्थापत्यातील सौंदर्य दाखवणारे! खरेतर हे स्तंभ किंवा अन्य भाग हे यादवकालीन हिंदू शैलीतील आहेत. ते अन्य ठिकाणचे वाटतात. त्याचीच जुळणी करत ही मशीद उभारल्याचे दिसते. इतिहासात सत्ताबदलानंतर होणाऱ्या सांस्कृतिक आक्रमणाचा हा एक भाग आहे. पण आता या साऱ्याच गोष्टींकडे एक इतिहास म्हणून पाहिले पाहिजे! अशी दृष्टी तयार केली म्हणजे इतिहास समजणे आणि जपणे सोपे जाते. या मशिदीमागे एका पडक्या खोलीत गडावरील साफसफाईत मिळालेली काही शिल्पे, शिलालेख, देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. नागफण्यांची प्रभावळ घेतलेला पाश्र्वनाथ, शेषावर आरूढ झालेला विष्णू, गद्धेगाळचे शिल्प, एक फारसी लिपीतील शिलालेख, वीरगळ आणि अन्य बरेच काही इथे आहे. पण यामध्येही लक्ष जाते ते सहा हातांच्या गणेशमूर्तीकडे. विविध आयुधे, कमळ, मोदक घेतलेल्या सहा हातांच्या गणेशाचा उल्लेख ज्ञानेश्वरीच्या पहिल्या...
Read moreThis fort is famous for its military architecture and military-engineering features. The famous ‘Mulukh Maidan Cannon’ was housed in this fort. A Sardar named Murar of Adil Shah of Bijapur took this cannon to Bijapur. Along with this, there is also a cannon called Ajda Paikar in the fort. Paranda fort has ancient Mahadev temple and Narsih temple as well as a mosque. The five-feet tall and six-armed idol of Ganesha in a dancing posture in the Paranda fort is unique. There are idols of Adisesha Tirthankara nearby which are in ruins today. The fort has a beautiful octagonal shaped well. [3].This is the Bhuikot fort and is in the middle of the city. Paranda Fort – Historical Background : Parimanda (Paranda) was an important pargana during the Chalukya period of Kalyani. The fort there is 35 meters long as wide. It was built by Mahmud Gawan, Prime Minister of Muhammad Shah Bahamani during Bahamani rule.
Address : Paranda Fort St. Paranda, Dist. Osmanabad- 413502 Barshi is 30 km...
Read more