रामगड (Ramgad) किल्ल्याची ऊंची : 165 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : मध्यमरांगणा गडाजवळ उगम पावणारी गड नदी ८० किमी अंतर कापून समुद्राला मिळते. या गडनदी मार्गे होणार्या व्यापारावर, जलवहातूकीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘रामगड’ किल्ला बांधण्यात आला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या एका डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला. आजही किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज शाबूत आहेत. इतिहास :रामगडची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. गडाचा इतिहास ज्ञात नाही. १८ व्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये लढाई चालू होती. त्यावेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला होता. तेव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होउन फेब्रुवारी १७९६ मध्ये रामगड जिंकला. ६ एप्रिल १८१८ ला रामगड किल्ला ब्रिटीशांनी जिंकून घेतला. त्यावेळी गडावर २१ तोफा व १०६ तोफगोळे असल्याचा उल्लेख मिळतो. पहाण्याची ठिकाणे :गडाच्या पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. गडाचे प्रवेशद्वार ८ फुट उंच आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला १८ फूट उंच बुरुज आहेत. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्यांची योजना केलेली आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस थोड्या अंतरावर अजून एक (चोर) दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला तटबंदी ठेऊन सरळ चालत गेल्यावर आपल्याला होळींच्या माळावर पोहोचतो. तेथे ७ तोफा रांगेत उलट्या पुरुन ठेवलेल्या दिसतात. त्यातील सर्वात मोठी तोफ ७ फूट लांबीची आहे. या तोफांसमोरच किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे उत्तराभिमुख प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशद्वाराच्या आत देवड्या आहेत. परंतू प्रवेशद्वारा बाजूच्या बुरुजांचे चिरे ढासळल्यामुळे प्रवेशद्वारातून रामगड गावातील होळीवाडीत जाणारा मार्ग बंद झाला आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या तटबंदीवरुन गड नदीचा प्रवाह दिसतो. गडाच्या मधोमध बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेले आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटावर जाण्यासाठी पायर्या आहेत. या तटावर काळ्या पाषाणातील गणपतीची अत्यंत सुबक मुर्ती आहे. बाजूलाच काही शाळूंका आहेत. या तटावरुन दुसर्या बाजूला पायर्यांनी उतरल्यावर आपण किल्ल्याच्या सध्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो व आपली गडफेरी पूर्ण होते. गडाला १८ फूट उंचीचे १५ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला ३ दिशांना खिडक्या आहेत. बुरुजांच्यामध्ये १८ फूटी तटबंदी असून तीने पूर्ण किल्ल्याला वेढलेले आहे. तटबंदीची लांबी अंदाजे ६४० मीटर आहे. गडावर किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा आहे, पण पाण्याची विहीर अथवा तलाव आढळत नाही.
पोहोचण्याच्या वाटा :रामगड गाव सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात आहे. कणकवली व मालवण दोन्ही कडून रामगडला जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत. १) रामगड कणकवलीहून १२ किमी वर आहे. कणकवलीहून मसूरे, आचरा मार्गे मालवण, देवगडला जाणार्या बसेसनी रामगडला जाता येते. २) रामगड मालवणहून २९ किमी वर आहे. मालवणहून आचरामार्गे कणकवलीला जाणार्या बसेसनी रामगडला जाता येते. खाजगी गाडीने मालवण -चौके - बागायत - मसदे - बेळणा - रामगड यामार्गेही जाता येते. राहाण्याची सोय :गडावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही, पण रामगड गावात आहे. पाण्याची सोय :गडावर पाण्याची सोय नाही, पण रामगड गावात आहे. जाण्यासाठी लागणारा वेळ :गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ: रामगड बाजारपेठेतून १५ मिनीटे लागतात.सूचना :मालवणहून सकाळी निघून (१२ किमी) मसूरे जवळील भरतगड व भगवंतगड पाहून (१७ किमी) रामगडला जाता येते. तसेच रामगडहून ओवळीये गावातील (१० किमी) सिध्दगड पाहून कसाल मार्गे (३६ किमी) मालवणला येता येते. या मार्गाने हे ४ किल्ले एका दिवसात पाहून होतात. यातील मालवण ते मसूरे व मसूरे - रामगड बसेस आहेत. परंतू रामगड ते ओवळीये व ओवळीये ते कसाल जाण्यासाठी रामगडहून रिक्षा करावी लागते. कसाल -...
Read moreThe fort has an open space called ‘Holi Cha Maal’, generally used to celebrate festivals in those days. There are total 3 doors to the fort one of which is no more accessible. The fort has total 15 bastions of 18 feet height protecting it from fire attacks in those days. It also has an idol of Lord Ganesh upstairs just after the entrance. Visitors can see the incredible view of River Gad at the right side of the fort. Ramgad Fort is a symbol of great fortification strategies and trade strategies implemented by...
Read moreरामगड किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे जो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित आहे. रामगड किल्ला समुद्र किनारपट्टीपासून काही अंतरावर असलेला एक दुर्ग आहे, जो प्राचीन काळात महत्त्वाचा होता.
रामगड किल्ल्याची माहिती:
स्थान: सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र
उंची: सुमारे 900-1000 फूट
बांधणीचा कालखंड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याआधीच्या काळात किल्ला बांधला गेला असावा, पण त्याच्या स्थापनेसंबंधी खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.
उद्देश: समुद्र किनाऱ्यावर निगराणी ठेवणे आणि त्या काळातील संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठिकाण
प्रकार: भूमिगत किल्ला (Land Fort)
किल्ल्याची वैशिष्ट्ये:
रामगड किल्ला छोटा असला तरी त्याचा ऐतिहासिक महत्त्व आणि दुर्ग बांधणी उत्कृष्ट आहे.
किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष, काही गोष्टी इत्यादी किल्ल्याच्या ऐतिहासिक ठिकाणी आढळतात.
किल्ल्याच्या वरील भागावरून अत्यंत सुंदर दृश्ये पाहता येतात, जसे की डोंगर रांगा, घनदाट जंगल आणि समुद्र.
किल्ल्यात एक राम मंदिर देखील आहे, ज्यामुळे किल्ल्याला धार्मिक महत्त्व आहे.
कसे जायचे:
सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी येथून रामगड किल्ल्यापर्यंत रस्ता आहे. ट्रेकिंगही करणे शक्य आहे, जो साधारण 1-1.5 तासाचा असतो.
किल्ल्याच्या पायथ्याशी वाहन रस्ता आहे, पण किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हलकी चढाई करावी लागते.
भेट देण्यासाठी उत्तम वेळ:
ऑक्टोबर ते मार्च ह्या कालावधीत सर्वोत्तम ठरतो कारण हवामान थोडे शितल आणि ट्रेकिंगसाठी योग्य असतो.
तुम्हाला रामगड किल्ल्याबद्दल आणखी काही...
Read more