हाॅटेल करी लिव्हजची गोष्ट
नोकरीची वाट पहाणा-या तरुणांना ' पकोडे बेचो ' असा अनाहूत सल्ला एका राजकीय पक्षाच्या नेत्याने दिल्यावर देशभर संतापाची लाट उसळली होती. सुरक्षित नोकरीची अपेक्षा करणा-या तरुण पिढीचा मनोभंग करण्याचा हा प्रकार होता. शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो असे म्हटले जाते. शिक्षणाने माणूस व्हाईट काॅलर होतो असेही म्हटले जाते. व्हाईट काॅलर समाजाची श्रममूल्ये वेगळी असतात. त्यात वडापावची गाडी बसत नाही. आज नाशिक शहरात ठिकठिकाणी अंडा रोल, चिकन रोलच्या गाड्या उभ्या असतात. पहिली गाडी सोळावर्षापूर्वी काॅलेजरोडला सुरु झाली . विकीज रोल अशी पाटी लावून हातगाडीवर अंडा रोल विकणा-या तरुणाचे नाव आहे विक्रम छबूराव उगले. तो रंजन सरकार नावाच्या मित्रासोबत विशाखापट्टणमला गेला. तिथे त्याला अशा गाड्या पहायला मिळाल्या. चार दिवसाच्या मुक्कामात विक्रम उगले याने या पदार्थाची रेसिपी समजून घेतली. नाशकात येऊन त्याने पहिली अंडा चिकन रोलची गाडी सुरू केली आणि या नव्या मेनूचे स्वागत करायला नाशिककरांनी लाईन लावली. विक्रम उगले हा तुमच्या माझ्यासारखा सामान्य मुलगा. सामान्य म्हणजे किती सामान्य तर याचा जन्म निफाड तालुक्यातील चापडगावसारख्या गावात चक्क खळ्यावर झाला . ' खळं ' या शब्दाचा अर्थ आजच्या पिढीला समजावून सांगावा लागेल. तेथे गरीबाच्या घरातल्या मायमावल्यांचे संसार फळले, फुलले. मुलांचे जन्मही झाले. विक्रम अशा नर्सिंग होम शिवाय जन्मलेल्या मुलांचा प्रतिनिधी. गंगा गोदावरीच्या काठावर वसलेल्या निफाड तालुक्यातील गावांना सुक्या दुष्काळाचा कमी सामना करावा लागतो . ओल्या दुष्काळाचे संकट तिथे जास्त असते. पुरामुळे तिथले जनजीवन विस्कळीत होत असते. अशा परिस्थितीत मांजरगावच्या विक्रम उगले याच्या वडीलांनी गाव सोडले. मांजरगावचे उगले नाशिकमध्ये आले ते पोरांचं लेंडार घेऊन. दहा बाय दहाच्या पत्र्याचे खोलीत संसार मांडला. त्यांनी सुरूवातीला वाॅचमनची नोकरी केली. कारण श्रीमंत व्यक्तीच्या बंगल्यात वाॅचमनला खोली असायची. ते नाशकात एकटे आले नव्हते. स्वतःच्या दोन पोरांसह भावाबहिनींची मुलंही त्यांनी शिकायला आणली होती. एकत्र कुटुंबाचा संस्कार असल्याने एवढ्याशा लहान खोलीत ते काबाडकष्ट करीत दिवस काढत होते. मुलांना आई वडीलांचे कष्ट दिसत होते. विक्रमची आजी सखुबाई भिमाजी उगले आणि आई सौ. कमल छबूराव उगले यांच्यात उद्योजकीय कौशल्य होती. म्हणजे त्या सासू सुना मेस चालवित. डबे पुरवित. एवढेच नव्हे तर धुणी भांडी, झाडू फरशी अशी काम करीत. उन्हाळ्यात कुरडई, पापड सुध्दा बनवून देत. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मेसमध्ये त्यांनी गुणी आणि बुध्दिमान मुलांच्या पोटाची काळजी घेतली. त्यांना अन्नपूर्णाच म्हणावं लागेल. त्या स्वयंपाकात राहिल्या आणि कळत न कळत घरातला अन्नपूर्णेचा वारसा विक्रमकडे आला. विक्रम नगरपालिकेच्या शाळेत शिकला . पुढे जवळच्या नवरचना विद्यालयात गेला . तो शाळेत फार हुशार विद्यार्थी नव्हता. बॅक बेंचर्स होता. मात्र परीक्षेत पास होत राहिला. शालेय वयातली एक सवय तो आठवणीने सांगतो. शाळेत जाताना एका दगडाच्या तुकड्याची तो ठिकरी करून शाळेपर्यंत नेत असे. त्यात कधी चूक होत नसे. एखाद्या गोष्टीचा सतत पाठपुरावा करण्याची सवय अशी बालवयातच त्याच्या अंगात भिनली. दहावी झाल्यावर त्याने एच पी टी काॅलेजमध्येच प्रवेश घेतला. त्याचवेळी त्याची ' कमवा व शिका ' योजना चालू होती. तो एका डाॅक्टरकडे पेशंटची वेटींगलिस्ट करीत असे. क्लिनिक बाॅयचे काम त्याने तेथे केले. कारण भूकेची आणि त्याची ओळख, मैत्री बालवयातच झालेली होती. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मेसमधून आई डबा घेऊन येईपर्यंत अनावर झालेली भूक त्याने अनुभवली होती. व्यवसाय करताना लाज बाळगायची नाही आणि ग्राहकाचे समाधान होईपर्यंत चिकाटी सोडायची नाही हे त्याने मनोमन ठरवलं होतं . त्याने न लाजता म.गांधी रोडवर वडा पावची गाडी सुरू केली. पुढे तो साहेबा हाॅटेलमध्ये काम करू लागला. दिवसा काहीवेळ काॅलेज आणि अन्य वेळात त्याचा जगण्याचा संघर्ष सुरू असायचा. साहेबा, चंद्रलोक अशा हाॅटेलात काम करता करता दिंडोरी रोडवरच्या स्काय पार्क हाॅटेलचे बार काऊन्टर तो सांभाळू लागला. बारचे काऊन्टर बंद व्हायला एक दोन वाजून जायचे. विक्रम तिथेच आडवा होई. जगण्याची त्याची लढाई पाहून वडीलांनी त्याच्या स्थैर्याचा विचार केला नसेल का ? छबूराव मुलाला घेऊन एका नगरसेवकाकडे गेले. ते त्यांचे कार्यकर्ते असल्याने त्यांनी मुलाला महापालिकेच्या उद्यानात माळ्याची नोकरी देण्याची विनंती केली. छबूराव उगले यांच्यासारख्या माणसाला महापालिकेची माळयाची नोकरी स्थैर्य देणारी वाटली. पण तेवढे भाग्य छबूरावांच्या नशिबी नव्हते तर त्याहून मोठे यश...
Read moreReview : Disappointing Experience
I recently visited CURRY LEAVES and unfortunately had a very disappointing experience.
The service was incredibly slow and unprofessional. It took forever for our orders to be taken, and even longer for the food to arrive. When it did come, it was cold and barely resembled what was described on the menu. The lack of attention to detail was evident in every aspect of the service.
Moreover, the quality of the food was underwhelming. The dishes were bland, Uncooked, and lacked any flavor or creativity. It was clear that the ingredients used were of poor quality, which reflected in the taste of the dishes.
To make matters worse, the restaurant seemed understaffed and overwhelmed, leading to a lack of attentiveness from the servers. It was a struggle to get anyone's attention, whether we needed a refill on our drinks or wanted to ask a question about the menu.
Overall, my experience at curry leave was one of the worst dining experiences I've had in a long time. I left feeling dissatisfied and frustrated with the entire visit. I would not recommend this restaurant to anyone looking for a pleasant dining experience. I will not recommend to...
Read moreI recently had the pleasure of dining at Curry Leaves at Mhasrul on the way to Tryambakeshvar , and it was a delightful experience. From the moment I walked in, the ambiance was so great , setting the perfect mood for a great meal.
The staff was attentive, friendly, knowledgeable, ensuring that every aspect of the dining experience was smooth and enjoyable.
As for the food, I tried the Maharashtrian cuisine which was so tasty . The Bajri Roti, Pithle and Bharit stood out as a highlight. Portions were generous, and the flavors were perfectly balanced, bold and creative.
I especially loved the Sizzling Brownie , which was super tasty.
It has ample parking space and the ambience is great.
It's a perfect place for Birthday parties and small functions. Overall I’d highly recommend it to anyone looking for Maharashtrian and Punjabi food, a cozy atmosphere.
Great food, excellent service above all a beautiful decor.
I’ll definitely...
Read more