विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते.
सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो).
माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.
उदय-अस्ताचे प्रमाणे | जैसे न चालता सूर्याचे चालणे | तैसे नैष्कर्म्यत्व जाणे | कर्मींचि असता ||
सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध आहे.
मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात,
शुक्र-शोणिताचा सांधा | मिळता पाचांचा बांधा | वायुतत्व दशधा | एकचि झाले ||
शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.
सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदती-शिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते.
पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे.
माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.
पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा | तरी हा भूगोलचि काखे सुवावा | तैसा विस्तारू माझा पाहावा | तरी जाणावे माते ||
भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.
पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.
परंतु माऊली ज्ञानोबाराय 725 वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.
तया उदकाचेनि आवेशे | प्रगटले तेज लखलखीत दिसे | मग तया विजेमाजी असे | सलील कायी ||
सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो. ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी,
मी सूर्याचेनि वेषे | तपे तै हे शोषे | पाठी इंद्र होवोनि वर्षे | मग पुढती भरे ||
विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.
या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रम्हांडे आहेत म्हणून भगवान अनंतकोटी ब्रहांडनायक ठरतात. परंतु माऊलीं ज्ञानोबारायांनी 725 वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे
अस्तित्व सांगतात, ना तरी भौमा नाम मंगळ | रोहिणीते म्हणती जळ | तैसा सुखप्रवाद बरळ | विषयांचा || किंवा "जिये मंगळाचिये अंकुरी | सवेचि अमंगळाची पडे पारी | किंवा ग्रहांमध्ये इंगळ | तयाते म्हणति मंगळ | इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र: परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे | किंवा स्वाती नक्षत्र: स्वातीचेनि पाणिये | होती जरी मोतिये | तरी अंगी सुंदराचिये | का शोभति तिये ||
कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते
जेथ हे संसारचित्र उमटे | तो मनरूप पटु फाटे | जैसे सरोवर आटे | मग प्रतिमा नाही ||
अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.
या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल. विज्ञानयुगात दिशाभुल झालेल्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्या-या संत वाड़मयाच्या सहवासात यावे.
🙏🏻 ॐराम...
Read moreसंत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात. संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथील मंदिराच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. तो खांब अजूनही तेथे आहे. ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’ असे केले आहे. ज्ञानदेवादी भावंडे पैठणहून शुद्धिपत्र घेऊन पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करताना नेवासा येथे आली. तेथील परिसर गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला निसर्गरम्य, शांत व अद्भुत आहे. ती भावंडे जवळजवळ दोन वर्षें त्या ठिकाणी राहिली, कारण त्या गावी करविरेश्वराचे (महादेवाचे) मंदिर होते. त्याच मंदिरातील या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव इत्यादी ग्रंथांची निर्मिती केली. महादेवाचे मंदिर कालौघात नष्ट झाले, परंतु मंदिरातील तो खांब मात्र त्याचे अस्तित्व टिकवून, त्याचे अलौकिक तेज सांभाळून उभा आहे. वारकरी पंथातील भाविक त्या खांबामध्ये ज्ञानदेवांचेच अस्तित्व पाहतात. ‘ज्ञानेश्वरी’सारख्या अभिजात ग्रंथनिर्मितीची साक्षात खूण आणि ज्ञानदेवांच्या अलौकिक अस्तित्वाचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्यामुळे गावाला महात्म्य लाभले आहे. तेथेच ज्ञानदेवांनी संपूर्ण जगताला ‘हे विश्वची माझे घर’ असे म्हणून विश्वात्मकतेचा, अखिल मानवतेच्या कल्याणाचा पसायदानरूपी महामंत्र दिला. अखिल मानवतेच्या सुखासाठी गायलेल्या त्या विश्वगीताचे ध्वनी त्या खांबाच्या साक्षीने त्या मंदिरात निनादले आणि त्या सुमधुर सुरांचा ‘पैस’ विश्वव्यापक बनला. त्यामुळे वारकऱ्यांसाठी तो केवळ खांब नाही तर त्यांच्या लेखी त्याचे स्वरूप ‘पाषाण झाला चिंतामणी’ असे आहे. तशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. ज्ञानदेवांनी शके १२१२ (इसवी सन १२९०) मध्ये त्या खांबाला टेकून समोरच्या श्रोतृवृंदाला गीतेवर प्राकृत भाषेत निरुपण केले, ते श्री सच्चिदानंद बाबाने लिहून घेतले (‘शके बाराशे बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरे | सच्चिदानंद बाबा आदरे | लेखकू जाहला |’) असा ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या लेखनाचा इतिहास आहे. तेथे भव्य मंदिर उभे आहे. त्या खांबावर चंद्र, सूर्य यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. शिवाय, त्यावर सुंदर असा शिलालेख कोरलेला आहे. तो असा – ‘ओन्नम (कर) विरेश्वराय | पिता महेन यत पूर्व (दत्त) षटकं जगद्गुरो | अखंडवर्ती तैलार्य, प्रतिमास सदा हि तत (रूपका) नां षटक संख्या देया अचंद्र सू एकं (यस्वी) करोति दुष्ट: तस्य ( स : ) पूर्वे वर्ज्यत्यथ | मंगलमं महाश्री |’ ज्या दानशूर भाविकांनी मंदिराच्या अखंड दीपज्योतीसाठी (नंदादीप) दान दिले त्यांचा उल्लेख त्या मंदिरात सापडला. त्या खांबास तेराव्या शतकातील भाषिक अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. पुराण वास्तू संशोधन विभागाच्या वतीने जे उत्खनन त्या परिसरात 1953-54 साली झाले त्यात जे अवशेष सापडले ते अश्मयुगीन, ताम्र-पाषाण युगातील व सातवाहन काळातील आहेत. त्यातून मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा अभ्यास या दृष्टीनेही त्या स्थळाचे महात्म्य अधोरेखित झाले आहे. त्याच खांबाच्या भोवती मंदिर बांधले गेले आहे. ते खांबासाठी मंदिर असणारे जगातील...
Read morePais Khamb....Amazing place with Energy ...This is the place where Saint Dnyaneshwar wrote dnyaneshwari..Clean place ....Visit any time place is open One of the famous temples in Maharashtra.. Its the temple of "Pais Khamb"[In Marathi पैस खांब ]... Saint Dnyaneshwar maharaj written Dnyaneshwari [One of the famous grantha]here.. One of the oldest temple.. Infrastructure is very huge and awesome.. Surrounding is very beautiful and peaceful... Must visit when you are planning / enroute to Newasa/Ahmednagar. Easy to notice from road. This is very nice big temple of Lord Dnyaneshwar. It's having very large campus area for devotees for seating and Resting. Lodging services also available for devotees to stay here. Parking space also very big. Kirtan, Parayan is always running here. So overall very beautiful holy calm place to visit.Highly...
Read more