शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. ‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती.
सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.
सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले.
इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.
यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाईला जीजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर...
Read moreThe sacred place where Shri Chhatrapati Shivaji Maharaj was born and spent his childhood. Located at the top of Shivneri Fort, the historical structure is strong and the surroundings are vast and beautiful. A single door entrance/exit leads to a queue to get in and out. Inside the structure there’s a room with a statue of the beloved Maratha Emperor. The stairs reach to the 1st floor where it is said, Shri Chhatrapati Shivaji Maharaj as a child then used to listen to stories narrated by his...
Read more2nd Oct 2024 Very beautiful historical place to spend time with family and friends.
Hardly 2 hrs journey from Pune.
Shivneri Fort, the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of the Maratha Empire. Built in the 17th century. The fort includes notable structures like the temple of Goddess Shivai and several water springs. The place is very neat and clean. In 2021, it was added to UNESCO's tentative list as part of Maratha military...
Read more