Nagarkhana
Nagarkhana things to do, attractions, restaurants, events info and trip planning
Description
Ratings
Posts
🙏🏻🚩 "जय शिवराय" 🚩🙏🏻 रायगड किल्ल्यावरील नगारखाना. एक अशी वास्तू जिने कित्येक महाराजाच्या पद्स्पर्षाला वंदन केले. याच नगारखान्यातील नगाऱ्याने प्रत्येक महाराजांच्या विजयावर नगारा वाजवून रयतेला महाराजांच्या विजयाची माहिती दिली. इतिहासातील त्या प्रत्येक घटनेचा तो साक्ष आहे. रायगडावरील सर्वात उंचीचे बांधकाम म्हणजे नगारखाना. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेलो की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. या नगारखाण्याच्या प्रवेशद्वारावरील सुबक, देखणी अशी शक्तीचे प्रदर्शन करणारे शिल्प आपले मन ओढून घेते. जेव्हा शिवाजी राजे स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले, तेव्हा याच नगारे वाजवून त्यांचे स्वागत केले गेले. तसेच येथूनच भंडारा उधळला गेला असेल, जेव्हा महाराज ३२ मन सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले होते. रयतेचे न्याय निवाडे सुद्धा याच नगारखान्यातच झाले. तसेच प्रत्येक विजयी लढाईनंतर याच नगारखान्यातून नगारे वाजवले गेले. आऊसाहेब, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी आणि मावळे यांनी ह्याच नगारखान्यातून प्रवेश केला असेलच. अशा सर्वांचे पदस्पर्श ह्या नगारखान्याला लाभलेत. त्यामुळे प्रत्यके महाराजांचा सहवास या नगारखान्याला लाभलेला आहे. त्यामुळेच आपण येथून प्रवेश करताना आपले मस्तक उंबऱ्यावर ठेऊन आत सदरेत प्रवेश करावा.या नगारखान्यात आल्यावर एक वेगळीच उर्जा संचारते. महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा नगारखाना आजतागायत खंबीरपणे उभा आहे. सह्याद्री आणि किल्ले प्रत्येक वेळी नवीन काही शिकवत असतात आपल्याला फक्त ते ओळखून घ्यायचे असते आणि त्याचे अनुकरण करायचे. सुर्याचे अस्ताला जाणे आणि त्याच्या त्या सौम्य सुवर्ण किरणांनी नगारखान्यावर घातलेला अभिषेक, हे दृष्य अविस्मरणीयच…
Omkar ChavanOmkar Chavan
00
Raigad Fort belonging to Chhatrapati Shivaji Maharaj includes little gateways namely Mena Darwaja, Palkhi Darwaja, Nagarkhana Darwaja and Maha Darwaja which elevate the enchantment levels here and show a glimpse of how people used to access the fort back in those days. While it held great grounds in the olden days, even today the Raigad fort sees a lot of tourists and local crowds who come here for activities including picnic, trekking and enjoying nature and its elements.
Suraj SalunkeSuraj Salunke
00
राजसभेच्यासमोर पूर्वेस जी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया सारखी भव्य इमारत दिसते तोच नगारखाना आहे. ही दुमजली सपाट माथ्याची इमारत असून तळमजल्यांत मोठा दरवाजा आहे . हेच राजसभेत शिरण्याचे प्रवेशद्वार होय . या द्वाराची उंची ३० फूट असून बांधकाम सर्व दगडी आहे . नगारखान्याची इमारत ५० फूट उंच , ३० फूट लांब व २० फूट रुंद आहे . कमानीखालून जो रस्ता जातो त्याच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत . या देवडीवर चढून गेले म्हणजे भिंतीत २९ पायऱ्यांचा एक जिना आहे . तो चढल्यावर नगार खान्याची जागा लागते . येथे स्वराज्याच्या अमदानींत त्रिकाल चौघडा व नगारा झडत असे . ज्या चौघड्याचा व नगाऱ्याचा निनाद स्वजनांस स्फूर्तिदायक , शत्रूस भीतिदायक , आतीस अभयसूचक , व स्वातंत्र्यलक्ष्मीस मंगलदायक वाटे , ते स्थल आज निस्तब्ध आणि ओसाड पाहून मन शतशः विदीर्ण होते. असो , येथून आणखी वरच्या मजल्यावर जाण्यास १० पायऱ्यांचा जिना भिंतीतच आहे . तो चढून वर गेले की , उघडे गच्चीसारखें पटांगण लागते . हेच किल्यांतील सर्वात उंच ठिकाण . येथून फारच भव्य व विस्तीर्ण देखावा दिसतो . पूर्वेस सह्याद्रीची काळी - कभिन्न लांबच लांब ओळ व त्यावरील सुळके , राजगड , लिंगाणा , तोरणा , कांगोरी हे किल्लेही येथून दिसतात . तसेंच रायगडावरील कुशावर्त तलाव , त्यापलीकडील पडक्या इमारती वगैरे दिसतात . आग्नेय कोपऱ्यांत प्रतापगड दिसतो . दक्षिणेस गुयरीचा डोंगर व दुसऱ्या अनेक टेकड्या दिसतात . पश्चिमेस तळगड दिसतो . व सायंकाळी आकाश निरभ्र असेल तर दुर्बिणी च्या साह्याने पश्चिमसमुद्र देखील दिसतो . नुसत्या डोळ्याने पश्चिम क्षितिजावर एक चकचकीत रुपेरी कडा दिसते .
कौस्तुभ सोष्टेकौस्तुभ सोष्टे
20
Raigad Fort belonging to Chhatrapati Shivaji Maharaj includes little gateways namely Mena Darwaja, Palkhi Darwaja, Nagarkhana Darwaja and Maha Darwaja which elevate the enchantment levels here and show a glimpse of how people used to access the fort back in those days. It has huge gate from where you can enter into Nagarkhana.
Sameer MandavkarSameer Mandavkar
20
Nagarkhana is the entrance of Kings court or Raj Darbar. This is the highest place in the fort. Nagarkhana was built in such a way that Sunrays coming from its entrance fall in straight line on the King's seat or Raj Sadar on the day of coronation ceremony that is 6th June 1674.
Prashant RanePrashant Rane
00
Nagarkhana is the entrance of Kings court or Raj Darbar. This is the highest place in the fort. Nagarkhana was built in such a way that Sunrays coming from its entrance fall in straight line on the King's seat or Raj Sadar on the day of coronation ceremony that is 6th June 1674.
Mahesh WaghMahesh Wagh
00
Nearby Attractions Of Nagarkhana
Raigad Fort
Raigad Ropeway
Takmak Tok
Shree Jagadishwar Temple
Meghdambari
Shree Shirkai Devi Temple
Gangasagar Lake

Raigad Fort
4.7
(11.6K)Click for details

Raigad Ropeway
4.6
(1.3K)Click for details

Takmak Tok
4.7
(355)Click for details

Shree Jagadishwar Temple
4.8
(321)Click for details
Reviews
- Unable to get your location