बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो. रामटेक हे शहर तालुका आहे. नागपुर-रामटेक नागपूर पासून ४७ की.मी.अंतरावर आहे. मनसर-रामटेक ७ की.मी.अंतरावर आहे. रामटेक येथील ९ स्थाने(आमचे स्वामी) -येथील ९ स्थाने एकाच परिसरात गावाच्या पूर्वेकडे रामटेक डोंगरावर भोगराम नावाने ओळखले जातात. येथील १ स्थान राममंदरीच्या चौकात आहे व उर्वरीत ८ स्थाने भोगराम नावाने ओळखले जानारे आपले मंदीर आहे तेथे आहेत. लीळा : परीभ्रमणाच्या एकांकात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी भडोचहून रामटेकला आले. स्वामींचे १० महिने वास्तव्य होते नंतर स्वामी रामटेकला गेले. हे भोजनात स्थान आहे. स्वामी आरोगणा करण्यासाठी येथे येत असत. रामटेकला वास्तव्य बोणेबाईची भेट आमच्या गोसावीयांचा मुक्काम खडकुलीला होता . ( उत्त . २१ ) तेव्हा भोगरामाच्या बायांनी आमच्या गोसावीयांना पाहिले आणि आश्चर्याने म्हटले , " हे तर आमचे नगीन देव आहेत . " तेव्हा बाईसाने विचारले , " बाबा , नगीन देव म्हणजे काय बरं ? " यावर आमचे गोसावी म्हणाले , " बाई , आम्ही पूर्वी भोगरामला होतो . यावर ही गोष्ट गोसावीयांनी सांगितली . आमचे गोसावी म्हणाले , " बाई , एक दिवस आम्ही भोगरामला गेलो . तेथे रामाच्या देवळात ओट्यावर आसन झाले . मग गावामध्ये भिक्षा केली . आंबाळा तळ्याच्या काठावर आरोगणा झाली . गोसावी कदाचित एखाद्या वेळी कापूर विहीरीकडे आरोगणा करीत होते . कदाचीत एखाद्या वेळी सेंदुरवीहीरीवर आरोगणा करीत होते . आमचे गोसावी एखाद्या दिवशी लक्ष्मणाच्या देवळाकडे विहरणासाठी बीजे तरीत व तेथे उपविष्ट होत . कधी हनुमंताच्या देवळाकडे विहरणासाठी बीजे करायचे तेथे आसनावर उपविष्ट होत . एखाद्या दिवशी सीतेच्या न्हाणीकडे विहरणाला बीजे करायचे तेथे उपविष्ट होत . तेथे पश्चिमकाठावरील लिंगाच्या देवळात विहरणाला बीजे करीत तेथे आसनस्थ होत . कधी आंबाळा तलावाच्या दक्षिण काठावर विहरणाला बीजे करीत तेथे पश्चिमेकडे श्रीमुख करुन आसनी उपविष्ट हेत असत . एखाद्या दिवशी नरसीहांच्या देऊळात विहरणाला बीजे करीत तेथे आसनी उपविष्ट हेत . एखाद्या दिवशी धम्मऋषीच्या देवळात विहरणाला बीजे करायचे तेथे आसनी उपविष्ट होत असत . एखाद्या दिवशी गुप्तरामी विहरणाला बीजे करायचे तेथे आसनी उपविष्ट होत असत . एखाद्या दिवशी गुप्त भैरवी विहरणाला बीजे करीत असत तेथे आसनी उपविष्ट होत असत . रामाच्या देऊळात आसन होत . भोगरामाच्या देऊळासमोर पटीशाळा तिच्या दक्षिण भींतीला पुर्वपश्चिम ओटा त्या ओट्यावर पहूड स्विकार करीत असत . भोगरामाच्या देवळातील ओट्यावर आमच्या गोसावीयांचे वास्तव्य झाले . गोसावीयांचा मुक्काम भोगरामच्या ओट्यावर होता . सकाळी आमचे गोसावी ओट्यावर उठून बसलेले होते . तितक्यात बोणेबाया ( मायलेकी ) देवतेच्या दर्शनाला आल्या . त्यांना आमचे गोसावी दिसले . त्यांनी गोसावीयांना दंडवत केले श्रीचरणास लागल्या . मग गोसावीयांना विचारले , " बाबा , आपले नाव काय ? " आमचे गोसावी गप्पच होते . मग पून्हा म्हटले , “ बा आपले नाव नगीनदेव आहे काय ? " गोसावीयांनी मान हालवून होकार दिला . मग त्यांनी आधी आमच्या गोसावीयांची पूजा केली . मग भोगारामाची पूजा केली . पूजा करुन आल्यावर गोसावीयांना विनंती केली , " बा , नगीनदेवहो आमच्या गुंफेत चलावे जी . " गोसावीयांना तेथे जाण्याची इच्छा होती . गोसावीयांनी विनंती मान्य केली . गोसावी त्यांच्या गुंफेत बीजे केले . बोणेबायांनी आमच्या गोसावीयांना बसण्यासाठी आसन टाकले . गोसावी आसनावर उपविष्ट झाले . मग त्यांनी आमच्या गोसावीयांना आरोगणा दिले . गोसावीयांनी गुळळा केला , वीडा घेतला . मग त्यांनी गोसावीयांना विनंती केली , “ बा , नगीनदेव हो येथे असाल तोपर्यंत आमच्याकडेच आरोगणा करावे . सकाळी जसे असेल तसे आरोगणा करावे . संध्याकाळच्यावेळी आम्ही भिक्षा मागून आणू भिक्षेत जे ऐईल त्याचे आपण आरोगणा करावे जी . ” आमच्या गोसावीयांनी त्यांची विनंती मान्य केली . गोसावी गुंफेत आरोगणेसाठी बीजे करीत , एखाद्यावेळी गोसावी श्रीकरी भिक्षा करीत . भोगरामाच्या देवळातील ओट्यावर पहूड स्विकारीत . तेथील पुजारी आधी आमच्या गोसावीयांची पूजा करीत होता . गोसावीयांच्या श्रीचरणावर फुले ठेवी धुपार्ती मंगळात करी . नंतर देवतेची पुजा करी नंतर देवतेला धुपार्ती मंगलार्ती करीत होता . अशाप्रकारे बरेच दिवस तेथे आमच्या गोसावीयांनी मुक्काम केला . मग आमचे गोसावी मनसळकडे बीजे केले . आमचे गोसावी बीजे केल्यानंतर तो पुजारी आमच्या गोसावीयांच्या ओट्यावर फुले ठेवित होता . गंधाक्षता वाहुन धुपार्ती मंगलार्ती करत.सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींच्या पदस्पर्शाने पावन चरणांकित ठिकाण आहे....
Read moreSindoor Baoli, a 12th-century stepwell near Ramtek, is a stunning example of Hemadpanti architecture with intricate carvings and historical significance.
Sindoor Baoli is a 1,200-year-old water tank nested in a forest at the feet of the hillocks behind.
The structure, today, stands dilapidated with corridors on three sides leading to the garbagriha where an idol of worship once stood.
The place is rather little known and is a little hidden gem close to the city of Nagpur.
Surrounded by lush greenery, it offers a peaceful retreat for history lovers and photographers.
This 1200 year old temple is a must visit place if you are in Ramtek.
Need to walk a little inside forest.
The place is small and can get crowded over the weekend.
Please do not litter the place and remove shoes when you enter the premises.
You can either get an auto or walk from...
Read moreNice place to visit for one day in Ramtek during monsoon view is peaceful from the top. There are many monkeys here, watchout for them they will took your stuff thinking there is food in it. You can go there along with your friends and family as well. Also khindsi lake can be viewed from the top which is beautiful! You can also plan for barbeque near that spot with your friends. Plus it is very easyly accessible you can go there by bike or car. Have fun...
Read more