बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी/गोविंदप्रभू यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो.
सोमवार पर्वानिमित्त लोणारला जाणे: एक दिवस सर्वज्ञ सकाळी फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा बोणेबाईने सर्वज्ञांना विनंती केली, "बा मौन्यदेव हो, हे सगळे लोक लोणारला सोमवार पर्वानिमित्य जात आहे. तरी तुम्हीही चला आपण पर्वाला जाऊ." सर्वज्ञांनी विनंती मान्य केली. सर्वज्ञ म्हणाले, "बाई, घ्या मात्रा. (प्रवासात लागणारे सामान)" मग त्यांनी साहित्य घेतले, लोणारला आले. सर्वज्ञ सरळ कुमारेश्वराच्या देऊळाकडे गेले. कुमारेश्वराच्या देऊळात बसले. बोणेबायांनी सर्वज्ञांजवळ मात्रा ठेवली. मग त्या अष्टतीर्थ करण्यासाठी गेल्या. सर्वज्ञ त्यांचे साहित्य सांभाळण्यासाठी तेथे थांबले. मग त्या अष्टतीर्थ करुन आल्या. मग त्यांनी मात्रा घेतली. सर्वज्ञ धारेकडे गेले. तेथे ओसरीमध्ये बसले. तेथे बायांनी मात्रा ठेवली. मग सर्वज्ञ लोणार कुंडाकडे गेले सर्वज्ञांनी गौमुखी श्रीचरण घातला. मग बायांनी आंघोळी केल्या सर्व लोकांच्या आंघोळी झाल्या. मग त्या बायांनी कुंडाला प्रदक्षिणा केली मग आल्या. मग कमरेभोवती बांधलेला साडीचा पदर व्यवस्थीत खोचला मात्रा घेतली. आणि सर्वज्ञांना म्हणाल्या, "बा मौन्यदेव हो, आता गावामध्ये चला." सर्वज्ञ म्हणाले, "बाई, चला." मग गावात गेले. तेथे दैत्यसुदनाच्या देऊळाच्या मागे वायव्य कोपऱ्यात एक मठ होता. तेथे मुक्कामासाठी जागा पाहिली तेथे सामान ठेवले. सर्वज्ञ परत धारेकडे गेले तेथे बसले. तोपर्यंत बोणेबायांनी स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्यावर लहान बोणेबाई आली व सर्वज्ञांना विनंती करुन घेऊन गेली. मग सर्वज्ञ आसनावर बसले. बोनेबायांनी सर्वज्ञांना भोजन दिले. भोजन झाल्यावर गुळळा झाला. विडा झाला. नंतर त्यांनी जेवण केले. मग तेथेच दैत्यसुदनाच्यामागे असलेल्या मठात रात्रीचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी बोणेबाया अष्टतिर्थ करुन आल्या मग सर्वज्ञ फिरण्यासाठी गेले. त्या दिवशी बाजार होता. बाजाराची वेळ होईपर्यंत सर्वज्ञ फेरफटाका मारुन दैत्यसुदनाच्या देऊळात आले तेथे आसनवर बसले. बोणेबाईने स्वयंपाक केला. मग सर्वज्ञांना भोजनासाठी विनंती करण्यास आली. सर्वज्ञांनी होकार दिला. सर्वज्ञ मठात गेले. भोजन झाले. गुळळा झाला. वीडा अर्पण केला. तेथे जरावेळ विश्रांती केली. सर्वज्ञांची विश्रांती झाल्यावर त्या बाजारात गेल्या. पाने सुपाऱ्या घेतल्या. दोन पदरी सदरा टोपी शिवून घेतली. वाहाणा (चपला) घेतल्या. तेव्हा बाजारात बराच उशीर झाला होता. मग त्यांनी म्हटले, "बा मौत्यदेव हो, चला ना सगळे लोक निघून गेले." सर्वज्ञ म्हणाले, "बाई, घ्या मात्रा." त्यांनी मात्रा घेतली, मग मेहकरच्या रस्त्याने निघाले.
सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींच्या पदस्पर्शाने पावन चरणांकित ठिकाण आहे....
Read moreLocated in Lonar Crator, in fornt of Seeta Nhani (Bath place of mother Seeta), it is a Lord Shiva temple. Originally built in Rashtrakula kings times, it was modified in later times. Its mention is found in ancien indian liiterature "Viraj Mahatmya" as two stories of Kumareshwar god. Stone steps are constructed from Gomukh temple to this place, where one can easily get down to the temple. From this place one can notice the nearby view of Lonar crator and surrounding...
Read moreThis place is also known as sita Nahani. If one is planning to visit Lonar crater. So this is the gateway toward the lake. The first stop is dhar. And need to take steps down towards this Temple and here also one can find the source of water, the origin of water is unknown. But water is drinkable.. But we need to take care, as its more slippary, from this stop. One can proceed towards the crater area by having the small...
Read more