चिंचवडचा देऊळवाडा ज्या वास्तूत ,इमारतीत किंवा वाड्यात महापुरूषांचा,साधूसंतांचा वावर झाला त्या ऐतिहासिक स्थळी आपण गेलो,फिरलो तर मनाला होणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. तशीच अवस्था माझी झाली आहे. दोन दिवसांपासून चिंचवडला मुक्काम. प्रकृती कारणास्तव घरातच बसून. वाचनात आणि खिडकीजवळ बसून समोरच्या 40मजली इमारतीचे चाललेले बांधकाम किंवा जाणार्या येणार्या धावत्या रेल्वे न्याहळणे असा वेळ घालविणे,एवढीच दिनचर्या. कंटाळलेली माझी दीन चर्या पाहून चिरंजीव सुधीर आणि सुनबाई सौ.मीनाक्षीने "चला आपण चिंचवडचा देऊळवाडा पाहू"असा आग्रह धरला.देऊळगावकर आडनावामुळे देऊळ आकर्षण साहजिकच. त्यानुसार गेलो. (दि.27मार्च 2025) महाव्दारानेच आतल्या वास्तूच्या भव्यतेची कल्पना दिली . वाड्यात शिरताच वातावरणातील पावित्र्यता जाणवली.मंगलमूर्तीच्या दर्शनाला जातांना तेथे लावलेली चित्रकथा फलके वाड्याचा इतिहास दर्शवित होती.वाड्याविषयी उत्कंठा आणि आदर वाढवित होती. मंगलमूर्ती देऊळवाडा आपला इतिहास सांगत होता....इथे झालो कसा..गणेश अवतार मोरया गोसावीचा भक्तीभाव देखोनिया,मोरगावचा मयुरेश्वर चिंचवडी आला , मंगलमूर्ती होऊनिया. ही गोष्ट इ.स.1489 सालची.त्यावेळी मोरया गोसावी यांचे वय होते 114 वर्षाचे. दरवर्षी यात्रेनिमित्त अष्टविनायकापैकी असलेल्या मोरगावला मयुरेश्वरांच्या दर्शनाला जाणे हा मोरया गोसावी यांचा नेम,शिरस्ता.वयोमान लक्षात घेऊन मयुरेश्वरांनीच गोसावी यांना दृष्टांत दिला की, "आपल्यातील द्वैताद्वेत संपले असून मीच तुझ्यासोबत चिंचवडला येत आहे. माझ्या रूपाने गणेश कुंडात शेंदरी रंगाचा तांदळा मिळेल. तेच माझे रूप आहे." याप्रमाणे मोरया गोसावी यांना दुसरे दिवशी कर्हा नदीतील गणेश कुंडात हा शेंदरी तांदळा प्राप्त झाला.त्याचा मंगलमूर्ती असा नावलौकिक झाला. मोरगावच्या मयुरेश्वराचा अंश असलेली हे मंगलमूर्ती चिंचवडच्या एका वाड्यात लाकडी गाभाऱ्यातील पितळी मखरीत बसविण्यात आली.पुढे मोरया गोसावी पुत्र श्री चिंतामणी महाराज आणि त्यानंतर पेशवे काळात नाना फडणवीस, हरिभाऊ फडके यांनी या वाड्यास प्रशस्त रूप दिले.आता हा वाडा देऊळवाडा,देव वाडा किंवा मंगलमूर्ती वाडा या नावाने प्रसिद्ध आहे. आजही या वाड्यात मोरया गोसावी यांचे वंशज राहतात. संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास भेट:याच वाड्यात माझी वाचनाची आवड लक्षात घेऊन सौ मीनाक्षी सुनबाई ने मोरया गोसावी बद्दलची माहिती देणारी पुस्तिका खरेदी केली, त्या पुस्तिकेत मंगलमूर्ती वाड्यात बालपणी शिवाजी महाराज अनेक वेळा येऊन गेले तसेच माॅं जिजाऊ साहेबांनी मंगलमूर्तीला पुतळ्याची माळ, नवरत्नांचा हार अर्पण केल्याचे तसेच मोरया गोसावी,जगत् गुरू तुकाराम महाराज, समर्थ रामदास ही संत मंडळीं येथे येऊन गेल्याची आणि त्या दोघांची याच वाड्यात प्रत्यक्ष भेट झाल्याची नोंद आहे.अनेक थोर मंडळीं, विभूती या वाड्यात येऊन गेलेल्या आहेत, त्याच पुण्य स्थळी आपण कांहीं वेळ बसलो अन हे क्षण सोनेरी आठवण बनले हा आनंद अप्रुपच. गणपती बाप्पा मोरया " आपण गणेशोत्सव किंवा गणपती पूजना नंतर गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया.... असा जयघोष करीत असतो... त्यातील मोरया हा उल्लेख मोरया गोसावी संदर्भात आहे.मोरया गोसावी हे गणेश रूपच आहे हे दर्शविणारा हा जयघोष आहे. श्री मोरया गोसावी बद्दल.. ****"" श्री मोरया गोसावी यांचे आईवडील बिदर(कर्नाटक) जिल्ह्यातील शाल गावचे.शाळीग्राम घराणे.तिर्थयात्रा करतांना अष्टविनायकापैकी मोरगावी आले. (इ.स.1324).पुत्र प्राप्ती साठी अनुष्ठान केले.मयुरेश्वर कृपेने मुलगा झाला(.इ.स.1375)म्हणून त्याचे नाव मयुरेश्वर ठेवले .लाडाने मोरया संबोधू लागले.पुढे लाड नावच प्रचलित झाले. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती. त्यांनी श्री नयनभारती यांच्याकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आणि ते मोरया गोसावी बनले. चिंचवडला कायमचे वसतीस्थान केले.पुढे दृष्टांत संकेतानुसार संन्यासाश्रमाचा त्याग करून गृहस्थाश्रम स्विकारून वयाच्या 96 व्या वर्षी विवाह केला.वयाच्या 104 व्या वर्षी पुत्र प्राप्ती झाली . (इ.स.1481) त्याचे चिंतामणी ठेवले.मोरया महाराजांनी वयाच्या 186 व्या वर्षी इ.स.1561मध्ये चिंचवड येथे पवना नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. असा हा इतिहास. मला ठाऊक झाला देऊळ वाड्यामुळे. शरद...
Read moreThis Mangal Murti wada is quite big wooden structured Ganesha temple in old-style located in Chinchwad Gaon and is very near to the famous Shree Moraya Gosavi Ganapati temple. You can easily reach this place within 5 minutes by walking from Shree Moraya Gosavi Ganapati temple. The entrance door of this wada is quite big and has a unique style. The main temple is also quite big with wooden pillars and old decoarative glass lanterns. There are various paintings depicting different stories related to Ganesh. The main idol is also very nice and the entire atmosphere is really very quite and even though the temple is located in Chinchwad gaon there are not many people here. Only those who know this temple visit here without fail. I always visit this temple when we visit Shree Moraya Ganapati temple. There is also a Vedpathshala i.e vedic teaching school . Do visit when in Chinchwad gaon...
Read moreJust loved this place , well maintained and peaceful. Below are some detials which i found about the wada on internet.
This wada has the idol of Mangalmurthi which Shri Moraya Gosavi got in the Karhe river in Morgaon. Adjoining this idol; is the idol of Kothareshwara, another Ganesh idol facing towards North. There is a Shami tree near the idol. There is a large sabha mandapa (hall) in front of the temple, which is built of wood. It has glass lamps and chandeliers. Large pictures of the Astavinayakas are erected here. All major festivals are celebrated in this hall. After Shri Moraya Gosavi, the Maharajas (in succession) resided in this wada. This wada is very spacious. It has been visited by Shivaji Maharaj, this proves its antiquity. Chintamani Maharaj built some sections in this wada, few other portions were built by Nana Phadanvis and...
Read more